MVPS's Horizon Academy, Pimpalgaon Uncategorized जागतिक दृष्टिदान दिवस

जागतिक दृष्टिदान दिवस



होरायझन अकॅडमी पिंपळगाव बसवंत येथे जागतिक दृष्टिदान दिवस १० जून रोजी साजरा करण्यात आला. इयत्ता आठवीतील श्वेता सोनवणे आणि इयत्ता नववी मधील अथर्व बनकर या विद्यार्थ्यांनी दृष्टीदान दिवसाविषयी माहिती दिली. या दिवसाचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करणे व अंध व्यक्तींना पुन्हा जग पाहण्याची संधी मिळवून देणे.
दृष्टिदान ही अत्यंत पवित्र आणि मानवतावादी कृती आहे. माणूस मृत्यूनंतर आपल्या नेत्रांच्या माध्यमातून कोणाच्या तरी जीवनात प्रकाश टाकू शकतो. आज जगात लाखो लोक अंध आहेत, ज्यांना फक्त दृष्टीची आवश्यकता आहे.
शाळा, महाविद्यालये, व सामाजिक संस्था यामार्फत जनजागृती कार्यक्रम, रॅली, पोस्टर स्पर्धा, व्याख्याने इत्यादींचे आयोजन या दिवशी केले जाते. डॉक्टर व तज्ज्ञ लोक नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगतात.
आपण सर्वांनी दृष्टिदानाचा संकल्प केला पाहिजे. मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांमुळे कोणाचे जीवन उजळू शकते, यासारखा मोठा सन्मान दुसरा नाही. “नेत्रदान – श्रेष्ठ दान” हे आपले ब्रीदवाक्य असावे.